ऑस्करसाठी ‘अनुजा’ शॉर्ट फिल्म शॉर्टलिस्ट, लापता लेडीज शर्यतीतून बाहेर

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे ऑस्कर. यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ चित्रपट नॉमिनेट झाल्याने सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पण, किरण राव दिग्दर्शित’लापता लेडीज’ ९७ व्या ऑस्कर पुरस्कार २०२५ च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ‘लापता लेडीज’ बाहेर पडला असला तरी भारताच्या अजून आशा संपलेल्या नाहीत. गुनीत मोंगा कपूर निर्मित लाइव्ह-ॲक्शन शॉर्ट फिल्म ‘अनुजा’ शॉर्टलिस्ट झाली आहे. त्यामुळे भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
ML/ML/PGB
18 Dec 2024