लवासामध्ये दरड कोसळून दोन व्हिला गाडले घेल्याची घटना, ३- ४ जण बेपत्ता

 लवासामध्ये दरड कोसळून दोन व्हिला गाडले घेल्याची घटना, ३- ४ जण बेपत्ता

पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये बुधवारी रात्रीपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या, पूरस्थिती निर्माण झाल्याच्या तर भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक नागरिकांना त्रास होतो आहे. त्यातच पुण्यातील लवासा हिल स्टेशनवर दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. दोन बंगल्यावर ही दरड कोसळली आहे. यामध्ये 3 ते 4 जण बेपत्ता झाले आहेत. घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे. पण अद्याप कोणीच घटनास्थळी आले नाही. स्थानिक नागरिक स्वत बचावकार्य करत आहेत.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *