लालू प्रसाद यादवांनी मुलगा तेज प्रतापची केली पक्षातून हकालपट्टी

 लालू प्रसाद यादवांनी मुलगा तेज प्रतापची केली पक्षातून हकालपट्टी

पटना, दि. २५ : राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आपला मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. लालू प्रसाद यादव यांनी तेज प्रताप यादव यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच तेज प्रताप यादव यांना कुटुंबातून देखील बेदखल करण्यात येत असल्याचं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. लालू प्रसाद यांनी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, या पोस्टमधून त्यांनी याबाबत माहिती दिली, इथून पुढे आता तेज प्रताप यांची पक्षात आणि कुटुंबासाठी कोणतीही भूमिका नसेल असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे.

वैयक्तिक जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्यानं सामाजिक न्यायासाठीचा आपला सामूहिक संघर्ष कमकुवत होतो. मोठ्या मुलाचा सार्वजनिक व्यवहार आणि वर्तन तसेच कार्यपद्धती आपल्या कौटुंबीक मुल्ये आणि परंपरांनुसार नाहीये. म्हणून मी त्याला पक्ष आणि कुटुंबापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्याचा पार्टी आणि कुटुंब यामध्ये कोणतीही भूमिका नसणार आहे. मी त्याला पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करत आहे, असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे.

त्याच्या आयुष्यातील चांगल्या वाईट गोष्टी आणि गुण -दोष पाहण्यासाठी तो सक्षम आहे. ज्या लोकांना त्याच्यासोबत संबंध कायम ठेवायचे आहेत, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या विवेकबुद्धीने निर्णय घ्यावेत. मी नेहमीच सार्वजनिक जीवनात योग्य अचारण असलं पाहिजे, या भूमिकेचा समर्थक राहिलो आहे, असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *