संजीवन समाधी सोहळ्यासाठी लाखो भाविक अलंकापुरीत

आळंदी, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविकांचा महामेळा अलंकापुरीत जमला आहे. साडेतीन लाखांहून अधिक भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. माउलींचा ७२८ वा संजीवन समाधी दिन सोहळा आज संपन्न होत आहे. तर, रविवारी सोहळ्याची सांगता होणार आहे.
पहाटे श्रींना पवमान अभिषेक ,दुधारती करण्यात आली. वीणा मंडप, भोजलिंगकाका मंडप, हैबतरावबाबा पायरीपुढे कीर्तन सेवा होत असून. सकाळी दहा वाजता नामदास महाराज यांचे कीर्तन झाले. महाद्वारात काल्याचे कीर्तन झाल्यानंतर श्रीगुरू हैबतरावबाबा यांच्या दिंडीची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास श्रींच्या समाधीवर पुष्पवर्षाव करण्यात आला तसेच यावेळी मंदिराच्या आवारात हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्प वर्षाव करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय उपस्थित होता.
ML/ML/SL
28 Nov. 2024