देशातील निष्क्रिय बँक खात्यांमध्ये लाखो कोटी रुपये अडकले
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : RBI ने देशातील बँकांमधील वाढती फ्रीज आणि निष्क्रिय खाती यावर चिंता व्यक्त केली आहे. बँकांना अशी खाती कमी करण्यासाठी तातडीने आवश्यक ती सर्व पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा खात्यांच्या केवायसीसाठी मोबाइल किंवा इंटरनेट बँकिंग, नॉन-होम ब्रांच, व्हिडिओ ग्राहक ओळख यासारख्या सोप्या प्रक्रियांचा अवलंब करण्यास बँकांना सांगण्यात आले आहे.
यासोबतच, केंद्र किंवा राज्य सरकारच्या विविध योजनांद्वारे अशा खात्यांमध्ये येणारी रक्कम कोणत्याही अडचणीशिवाय जमा होत राहील याची काळजी घेण्यास सांगितले आहे. ज्या खात्यांमध्ये दोन वर्षांपेक्षा जास्त काळ कोणतेही व्यवहार झालेले नाहीत त्यांना निष्क्रिय खाती म्हणून वर्गीकृत केले जाते.
आरबीआयने बँकांना त्रैमासिक आधारावर निष्क्रिय खात्यांचा अहवाल जारी करण्याचा सल्ला दिला आहे. याआधी आरबीआयने अशा खात्यांमधून होणारी फसवणूक रोखण्यासाठी बँकांना निगराणी वाढवण्याची सूचना केली होती. सरकारी आकडेवारीनुसार, 2023 च्या अखेरीस अशा खात्यांमध्ये 1 लाख कोटींहून अधिक रक्कम अडकली होती. त्यापैकी सुमारे 42 हजार कोटी रुपये हक्क नसलेले आहेत.
डिसेंबर 2023 मध्ये, अर्थ मंत्रालयाने संसदेत माहिती दिली होती की बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवी वार्षिक आधारावर 28% वाढून मार्च 2023 मध्ये 42,270 कोटी रुपये झाल्या आहेत, जे मार्च 2022 मध्ये 32,934 कोटी रुपये होते. त्यापैकी 6,087 कोटी रुपये खासगी बँकांमध्ये आहेत.
SL/ML/SL
4 Dec. 2024