आषाढी एकादशीनिमित्त मुंबईत भक्तांसाठी लाडू वाटप

 आषाढी एकादशीनिमित्त मुंबईत भक्तांसाठी लाडू वाटप

मुंबई,दि ६
आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने बाळाई चॅरिटेबल ट्रस्ट आणि धगधगती मुंबई परिवार यांच्या वतीने समाजसेवेचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. कोपरखैरणे येथील चिकनेश्वर मंदिर (तीन टाकी बस डेपो मागे), तसेच धारावीतील खांबदेव नगर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात हे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमात हजारो भाविक भक्तांना राजगिरा लाडू, केळी व तुळशीचे रोप यांचे वाटप करण्यात आले. याचबरोबर शारदा विद्या मंदिर स्कूल, नवी मुंबई येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनाही फराळाचे वाटप करण्यात आले.

“सेवेतून परमार्थ साधायचा आणि समाजासाठी काहीतरी करायचं” या उदात्त भावनेतून हा उपक्रम दरवर्षी वेगवेगळ्या मंदिरांमध्ये साजरा करण्यात येतो.

कार्यक्रमाला शारदा विद्या मंदिरचे अध्यक्ष रमेश संकपाळ, समाजसेवक राजू मोरे, विठ्ठल तोरणे बुवा, DDM न्यूजचे संपादक भीमराव धुळप, चित्रपट अभिनेते अभिजित कदम, जयवंत पाटील, सुनील जाधव, संतोष धुळप, दिव्या झांजले, मंदिर ट्रस्टी निलेश पाटील, मंगेश कवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या सेवाभावी उपक्रमामुळे भक्तांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून, समाजात अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *