लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या २,६५२ सरकारी बहिणी ठरल्या अपात्र

 लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या २,६५२ सरकारी बहिणी ठरल्या अपात्र

मुंबई, दि. ३१ : राज्य सरकारने मोठ्या उत्साहाने आणलेल्या लाडकी बहिण योजनेमुळे राज्यातील लाखो माताभगिनींना आर्थिक आधार मिळत आहे, हे खरे असले तरीही अनेकजण याचा गैरफायदा घेतानाही दिसून येत आहेत. विधानसभा निवडणुकांपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली होती. या योजनेत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना दरमहा १,५०० रुपये मदत दिली जाते. सरकारी कर्मचाऱ्यांचे उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असते. त्यामुळे ते या योजनेस पात्र नाहीत. तरीही, अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी कोणतीही तपासणी न करता या योजनेचा लाभ घेतला.

योजनेत महिलांना दरमहा १,५०० रुपये देण्यात येत आहेत. मात्र, आता आर्थिक अडचणींमुळे सरकारला या योजनेत सुधार करावे लागत आहे. योजनेत अपात्र ठरलेल्या २,६५२ सरकारी कर्मचाऱ्यांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यांनी घेतलेले ३.५८ कोटी रुपये सरकार परत घेणार आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे सरकारवर आर्थिक भार वाढला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

लाडकी बहीण’ योजनेमुळे सरकारवर मोठा आर्थिक भार पडत आहे. त्यामुळे सरकारने काही कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. IT विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, ही आकडेवारी आणखी वाढू शकते. कारण अजूनही सुमारे ६ लाख कर्मचाऱ्यांच्या नोंदी तपासणे बाकी आहे. राज्य सरकारचेकर्मचारी, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर आणि इतर महानगरपालिका तसेच सरकारी शिक्षकांचा यात समावेश आहे. या सर्वांच्या नोंदी तपासल्या जाणार आहेत. या प्रक्रियेला वेळ लागेल, कारण आम्ही या सर्व संस्थांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड मागवले आहेत.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *