लाडकी बहीण साठी सप्टेंबरपर्यंत दोन कोटींहून अधिक महिला पात्र
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख अर्ज आले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या एक कोटी साठ लाख महिलांना दोन महिन्याचे लाभ दिले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या अर्जांची छाननी सुरू आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत या योजनेअंतर्गत दोन कोटी पेक्षा अधिक महिला पात्र ठरतील, असे महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.
सुरुवातीला ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. मात्र सातत्याने अर्ज प्राप्त होत आहेत. म्हणून मुदत वाढविली. दर महिन्याला अधिकाधिक महिलांपर्यंत पंधराशे रुपयांचा लाभ पोहोचविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्यांनी अर्ज भरले होते, त्यांना जुलै आणि ऑगस्टनंतर सप्टेंबर महिन्याचा लाभही लवकरच दिला जाईल. सप्टेंबर महिन्यात आलेल्या पात्र अर्जांनाही या महिन्यात लाभ मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
PGB/ML/PGB
16 Sep 2024