लाडके डोंगर योजना

 लाडके डोंगर योजना

travel nature

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यातील हिंगणे भागातील तळजाई टेकडीच्या मागचा भाग अनधिकृतपणे फोडून भूमाफियांकडून परिसराचे सपाटीकरण करणे सुरु आहे. यामध्ये हा भाग धोकादायक झालेला असून, येथे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पुणे महानगरपालिका व वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. ‘लाडके डोंगर योजना राबवून हिंगण्याला वायनाड होण्यापासून थांबवा, अशी मागणी पर्यावरणप्रेमी अनंत घरत यांनी महापालिका आयुक्त आणि तहसीलदार यांना केली आहे.

तसेच पालकमंत्री अजित पवार यांनाही पत्र पाठवून लाडकी बहीण योजनेसारखी ‘लाडका डोंगर योजना” आखून पुणेकरांचे, पर्यावरणाचे व पुण्याला लागून असलेल्या सह्याद्री पर्वतरांगांचे रक्षण करावे अशी विनंती केली आहे. घरत म्हणाले की, पुण्यातील टेकड्यांवर बीडीपी आरक्षण असताना अनाधिकृतपणे प्लॉटिंग करून सामान्य जनतेची व प्रशासनाची मोठी फसवणूक भूमाफिया करत आहेत. हिंगणे खुर्दमधील अथर्व नगर जवळील विकास आराखड्यात असलेला नैसर्गिक ४० फुटी नाला भूमाफियांनी बुजविला आहे. तसेच तळजाईच्या डोंगरातून येणारे धबधबे, जिवंत झरे, प्रवाह यांचे डोंगर फोडकरुन नुकसान केले आहे. डोंगरफोडीतून गौणखानिज मुरूम उत्खनन करुन शेकडो ट्रक विकले गेले आहे. त्याला जबाबदार असलेल्यांवर प्रशासनाकडून कोणतेही कारवाई केली जात नाही.

PGB/ML/PGB
20 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *