जगातील सर्वांत मोठ्या हिमखंडाने ३० वर्षांनंतर बदलली जागा
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाढते कर्ब उत्सर्जन आणि निसर्ग चक्रातील मानवी हस्तक्षेपामुळे जागतिक तापमानवाढ झपाट्याने होत आहे. यामुळे हिमनद्या वितळत आहेत, हिमनग आपली जागा बदलत आहेत. जगातील सर्वांत मोठ्या हिमनगाचे ३० वर्षांनंतर जागा बदल्याची माहिती समोर आली आहे.
स्वत:च्या जागेवरून सरकलेल्या या महाकाय हिमखंडाचे नाव ‘A23a’असे आहे. गेल्या तीस वर्षांपासून तो समुद्राच्या तळात फसला होता. आता मात्र तब्बल ३० वर्षांनंतर या हिमखंडाने आपली जागा बदलली आहे. हा हिमखंड जगातील सर्वांत मोठा हिमखंड आहे.
हा हिमखंड ब्रिटनमधील ग्रेटर लंडन या प्रदेशाच्या आकाराच्या दुप्पट आहे.
ग्रेडर लंडन या प्रदेशाचे आकारमान ४ हजार स्क्वेअर किलोमीटर आहे. A23a हा हिमखंड आकाराने तब्बल ८ हजार स्क्वेअर किलोमीटरपेक्षाही मोठा आहे.
याआधी हा हिमखंड १९८६ साली अंटार्क्टिका समुद्रकिनाऱ्यापासून विलग झाला होता. त्यानंतर तो वेडेल समुद्रात अडकला होता. आता मात्र उच्च साधारण ३० वर्षांनंतर हा हिमखंड पुन्हा एकदा आपल्या जागेवरून सरकतोय.
यामुळे पर्यावरण तज्ज्ञ या बदलाचे कारण शोधत आहेत. Ladies, these 5 signs are causing your mental health
SL/ KA/ SL
25 Nov. 2023