“लाडकी बहिण योजना: महिलांच्या हक्कांचा ठसा”
“लाडकी बहिण योजना: महिलांच्या हक्कांचा ठसा”
“लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये छाननी करण्याचा आमचा कोणताही विचार नाही. याबाबत सुरू असलेली चर्चा चुकीची आहे. कारण आम्ही अतिशय व्यवस्थितरित्या ही योजना राबवलेली आहे. राज्यातील २ कोटी ४० लाखांपेक्षा अधिक महिलांना या योजनेंतर्गत लाभ मिळत असून आम्ही सर्व पात्र लाभार्थी महिलांचा समावेश केला आहे,” असे स्पष्टीकरण राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
त्या पुढे म्हणाल्या की, “महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना महत्त्वपूर्ण आहे. महिला सशक्त होत असल्याने राज्याचा विकास देखील अधिक वेगाने होत आहे.”
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हा उपक्रम सरकारकडून एक महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.