वाहतूक सुविधांअभावी शिक्षण महागले

 वाहतूक सुविधांअभावी शिक्षण महागले

बंगळुरू,दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट, डिझाईन आणि टेक्नोचे कॅंम्पस काही महिन्यांपूर्वी गोविंदपूरा या ठिकाणी हलवण्यात आले आहे. ही सस्था मनिपाल एकॅडमी ऑफ हाय्यर एज्युकेशन या संस्थेत (MAHE) विलिन झाल्याने MAHE च्या गोविंदपूरा येथील कॅम्पसमध्ये सृष्टी इन्स्टिट्यूट हलवण्यात आले आहे. मात्र यामुळे सृष्टीच्या विद्यार्थ्यांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत.

सृष्टीमध्ये बहुतांश बाहेरगावचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याआधी विद्यार्थी संस्थेच्या आसपासच्या परिसरातच पेईंग गेस्ट स्वरूपात राहत होते. मात्र आता कॅम्पस गोविंदपूरामध्ये हलल्याने त्यांना या प्रवासासाठी चांगलेच कष्ट आणि आर्थिक भूर्दड सहन करावा लागत आहे.

आत्ताचे कॅम्पस हे आधीच्या कॅम्पस पासून १० किमी. दूर आहे. येथे ये- जा करण्यासाठी सार्वजनीक वाहतूक सुविधा नाहीत, रस्ते अतिशय खराब आहेत त्यामुळे खाजगी वाहनांना दामदुप्पट पैसे देऊन विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो. जवळपास सातशेहून अधिक विद्यार्थी या मार्गावर प्रवास करतात त्यामुे आता या नवीन कॅम्पसमध्ये पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांचे श्रम, वेळ आणि पैसे वाचावेत म्हणून संस्थेने किफायतशीर बस सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

SL/KA/SL
13 Feb. 2023

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *