चार लेबर कोड विरुध्द लवकरच लढा उभा करणारकामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीची घोषणा*
मुंबई, दि २६
सिटू,इंटक,एचएमएस,भारतीय कामगार सेना, आयटक आदी संयुक्त कृती समितीच्या लढ्यात उतरलेल्या संघटनांच्या वतीने,आझाद मैदानावरील सभेत केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी देशातील २९ कामगार कायदे रद्द करून,चार लेबर कोड एक तर्फी लागू केल्या आहेत.त्याचा काळा कायदा असा उल्लेख करून आजच्या सभेत तिव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे.कामगार कर्मचारी संघटना कृती समितीच्या वतीने आज आझाद मैदान येथे सभा पार पडली.
सभेत भारतीय कामगार सेनेचे संतोष चाळके,एच.एम.एसचे संजय वढावकर,सर्व श्रमिक संघाचे उदय भट,सिटूचे विवेक मोंटेरो,इंटकचे निवृत्ती देसाई,एचएमएसचे धुमाळ,श्रीमती त्रिशाला कांबळे,डॉ.माथूर आदींनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या एकतर्फी निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.कामगार वर्गाला मारक आणि मालकांना तारक ठरणा-या या चार कामगार सहिता ताबडतोब मागे घेण्यात याव्यात आणि पूर्वीचे २९ कामगार कायदे कार्यान्वित करावे,अशी सभेत जोरदारपणे मागणी करून लवकरच एक मोठे आंदोलन उभे करण्याचा याप्रसंगी निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रसंगी इंटकचे देवराज सिंग,मुकेश तिकोटे,बजरंग चव्हाण, शिवाजी काळे आदींनी सभा पारपाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.KK/ML/MS