2500 कर्मचाऱ्यांना काढल्या प्रकरणी TCS वर कामगार विभागाची कारवाई

 2500 कर्मचाऱ्यांना काढल्या प्रकरणी TCS वर कामगार विभागाची कारवाई

पुणे, दि. १७ : TCS कंपनीच्या पुण्यातील कॅम्पसमध्ये एकाचवेळी 2500 IT कर्मचाऱ्यांना नोकरीवरु काढून टाकण्यात आले होते. नोकरी गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांनी TCS कंपनीवर अनेक आरोप केले होते. या आरोपींची दखल घेत कामगार विभागाने मोठी कारवाई केली आहे. TCS कंपनीला नोटीस बजववण्यात आली आहे.

ऑक्टोबर 2025 मध्ये टीसीएसने त्यांच्या पुणे कार्यालयातील सुमारे 2,500 कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने किंवा अचानक कामावरून काढून टाकले. एनआयटीईएसचे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांनी कर्मचाऱ्यांना काढून टाकणे बेकायदेशीर असल्याचा आरोप केला होता. पुण्यातील TCS ऑफिसमधील सुमारे 2500 कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला होता. नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट (एनआयटीईएस) ने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात हा आरोप केला होता. एनआयटीईएसचे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांनी या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारकडून त्वरित कारवाई करण्याची विनंती केली होती.

कामगार विभागाने कर्मचाऱ्यांच्या कपातीबाबत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीला नोटीस बजावली आहे. कामगार आयुक्तालयाने कर्मचाऱ्यांच्या कपातीबाबत कंपनीकडून स्पष्टीकरण मागणारी नोटीस बजावली आहे. नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट (NITES) च्या तक्रारीच्या उत्तरात ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान TCS ने पुढील वर्षभरात त्यांच्या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 2 टक्के किंवा अंदाजे 12,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तांत्रिक बदल आणि ऑटोमेशनच्या युगात कंपनीला अधिक कार्यक्षम आणि भविष्यासाठी सज्ज ठेवण्यासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचे सागंत कंपनीने कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *