JNU मध्ये सुरू हाेणार ‘कुसुमाग्रज मराठी अध्यासन’

नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २७ फेब्रुवारी या कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी जेएनयुमध्ये कुसुमाग्रजांच्याच नावे मराठी अध्यासन सुरू करण्यात येणार असून त्यासाठी १० काेटी रुपये देण्यात येणार असल्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. दिल्लीच्या तालकटाेरा स्टेडीयममध्ये २१, २२, २३ तारखेला हाेण्ाऱ्या ९८व्या मराठी साहित्य संमेलनाची विशेष रेल्वे पुण्याहून बुधवारी (१९ जानेवारी) दिल्लीकडे रवाना झाली. यावेळी सामंत यांनी ही माहिती दिली.
अध्यासनाचे उद्देश
एम.ए, पीएच.डी अभ्यासक्रम.
मराठी भाषा विस्तार, प्रचार.
अभिजात मराठी वाङमय, साहित्य देशभरातील साहित्यिकांना उपलब्ध हाेइल. जेएनयुमध्ये अध्यासन सुरू झाल्यास देशातील इतर विद्यापीठांमध्येही फायदा.
SL/ML/SL
20 Feb. 2025