लैंगिक अत्याचाराविरोधी लढ्यानंतर आता ऑलिम्पिकच्या आखाड्यासाठी सज्ज झाल्या महिला कुस्तीपटू

 लैंगिक अत्याचाराविरोधी लढ्यानंतर आता ऑलिम्पिकच्या आखाड्यासाठी सज्ज झाल्या महिला कुस्तीपटू

लैंगिक अत्याचाराविरोधी लढ्यानंतर आता ऑलिम्पिकच्या आखाड्यासाठी सज्ज झाल्या महिला कुस्तीपटू

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रितिका हुड्डा हिला कदाचित ऑलिम्पिकपर्यंत पोहोचताही आलं नसतं. पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या पाच महिला कुस्तीपटूंमध्ये तिचा समावेश आहे. राष्ट्रीय आणि आशियाई स्पर्धांमध्ये वारंवार पराभवाचा सामना कराला लागल्यानंतर रितिकाचा आत्मविश्वास पुरता डळमळीत झाला होता.

पण ढासळत चाललेल्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी तिला प्रशिक्षण आणि स्पर्धांमध्ये भाग घेणं गरजेचं होतं. पण त्यावेळी भारतात कुस्ती स्पर्धा किंवा सराव थांबलेला होता.

हरियाणातील 20 वर्षीय तनू मलिक म्हणाली, “मी साक्षी मलिकला ऑलिम्पिक पदक जिंकताना पाहिलं होतं. त्यामुळे मीही कुस्ती खेळायचं धाडस केलं. माझ्या नावामुळे माझ्या गावाची प्रतिमा उंचावणार होती. जेव्हा साक्षीला टीव्हीवर रडताना पाहिलं तेव्हा माझ्या मनात आलं, की ती आपल्यासाठी इतकी लढली तर आम्ही हार कशी मानू?”

आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी शिक्षा खरब म्हणाली की, “प्रशिक्षणात पडलेला खंड आणि कुस्ती स्पर्धा थांबल्याने काही कुस्तीपटूंचं पूर्ण वर्षं वाया गेलं.” मात्र साक्षी मलिकला याचं काही दु:ख नाही. ती म्हणाली, “आपण लढा दिला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता महासंघात कोणीही असं वागणार नाही. आता त्यांना कळलं आहे की छळ केला तर त्याचे काय परिणाम होतील.”

ML/ML/PGB
24 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *