मुंबई विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत श्री गणेश आखाड्यातील तीन पहलवानांची राष्ट्रीय स्पर्धेत निवड…

ठाणे दि ८ : दिनांक ७ व ८ सप्टेंबर रोजी सोनुभाऊ बसवंत महाविद्यालय,शहापूर या ठिकाणी संपन्न झालेल्या मुंबई विद्यापीठीय आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा २०२५-२६ मध्ये ,
मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने व मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्या च्या तीन पैलवानांनी 🥇सुवर्ण तर दोन कांस्य🥉 पदक जिंकले .
पै.विशाल जाधव याने ९७ किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले त्याने जे.आर.साळवी कॉलेज च्या विपुल परब ला ९-० ने हरविले,
पै.कोमल पटेल हिने ५० किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले तिची फायनल ची लढत बी. के. बिर्ला कॉलेज च्या भूमी भोईर सोबत झाली कोमलने चितपट करत विजय मिळविला.
पै.मनीषा शेलार हिने ५३ किलो वजनी गटात सुवर्ण पदक प्राप्त केले रिझवी कॉलेजच्या सबाशाह ला चितपट करत तिने सुवर्ण पदकाला गवसणी घातली.*
तर ,
पै.सूरज माने याने ८६ किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले ह्या चारही पैलवानांनी अभिनव कॉलेज ऑफ आर्टस , कॉमर्स अँड सायन्स चे प्रतिनिधित्व करत आपल्या अभिनव कॉलेज चे नाव रोशन केले.
तसेच पै.सुदिक्षा जैस्वार हिने ६२ किलो वजनी गटामध्ये कांस्य पदकाची कमाई केली.
अभिनव कॉलेज च्या पैलवानांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत मुलांच्या व मुलींच्या तिसऱ्या क्रमांकाची चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावे केली , त्यांना अभिनव कॉलेज चे पी.टी शिक्षक सचिन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
सुवर्ण पदक जिंकलेल्या पहलवानांची निवड अखिल भारतीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धे करिता करण्यात आलेली आहे.
श्री गणेश आखाड्याचा पै.ओम सुनील जाधव याने पुणे विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत १९ वर्षाखालील वयोगटात ९२ किलो वजनी गटात 🥈 रजत पदक प्राप्त केले. सर्व पैलवानांना आखाड्याचे मुख्य वस्ताद वसंतराव य.पाटील तसेच कुस्ती प्रशिक्षक पै.वैभव माने यांचे मार्गदर्शन लाभले.ML/ML/MS