मुसळधार पावसामुळे पाच वर्षांनंतर प्रथमच कुंडलिका नदीला पूर…..

जालना दि १८:– मुसळधार पावसामुळे जालन्यातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीला पूर आला आहे. पाच वर्षांनंतर प्रथमच या नदीला पूर आला असून नदी ओसंडून वाहत आहे. मागील 3 ते 4 दिवसांपासून जालना जिल्हाभरात मुसळधार जोरदार हजेरी लावत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील नदी, नाले ओसंडून वाहू लागलेत. जालन्यातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीलाही मुसळधार पावसामुळे पूर आला असून पाच वर्षानंतर प्रथमच ही नदी ओसंडून वाहत आहे.ML/ML/MS