कुंडलिका तुडुंब भरून वाहू लागली, शाळा बंद

अलिबाग, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड आणि रोह्यासह सर्व तालुक्यात मुसळधार पाऊस असल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत, कुंडलिका नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे, त्यामुळे जुना पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे.
रोहा नगरपालिकेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, रोहा इथे अष्टमी पुलावर पोलीस तैनात असून शाळा कॉलेजेस ना सुट्टी देण्यात आली आहे.
अलिबाग, रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात रात्रभर मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे डोंगर माथ्यावरून येणारे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. मुसळधार पावसामुळे संपूर्णपणे जनजीवन विस्कळीत झाले आहे.डोंगर माथ्यावरून भरून येणाऱ्या नदी नाल्यामुळे कुंडलिका नदीत तुडुंब भरून दुथडी वाहू लागले आहे. मोठ्या प्रमाणात कुंडलिकेच्या पात्रात पाणी आले आहे.
रोहा अष्टमी शहराला जोडणारा जुना पूल वाहतुकीस बंद करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण वाहतूक ही नव्या पुलावरून वळविण्यात आले आहे. सातत्याने कुंडलिका नदीच्या पात्रात पाणी वाढत आहे त्यामुळे नगरपालिकेने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सकाळी दहाच्या सुमारास नगरपालिकेने सायरन वाजवले.
पाऊस सातत्याने मुसळधार पडत असल्याने जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.
ML/KA/SL
19 July 2023