कुंभमेळा आयुक्त म्हणून या अधिकाऱ्याची नियुक्ती

मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र शासनाने राज्यातील सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये रत्नागिरी , नाशिक, जळगाव आणि पुणे जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांच्या तसेच इतर महत्त्वाच्या पदांवर फेरबदल करण्यात आले आहेत. पुढील वर्षी नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यांचे प्रचंड व्यवस्थापन लक्षात घेऊन सध्याचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची नियुक्ती कुंभमेळा आयुक्त, नाशिक म्हणून करण्यात आली आहे.
बदली झालेले अन्य अधिकारी
देवेंद्र सिंह
, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते, यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव म्हणून करण्यात आली आहे.
जलज शर्मा
नाशिकचे जिल्हाधिकारी होते, यांची नियुक्ती नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून झाली आहे.
आयुष प्रसाद
जळगावचे जिल्हाधिकारी यांची बदली नाशिक जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
रोहन घुघे
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती जळगाव जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
संजय कोलटे
शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक यांची बदली साखर आयुक्त, पुणे या रिक्त पदावर करण्यात आली आहे.
मनोज जिंदल
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक होते, यांची नियुक्ती रत्नागिरी जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे.
SL/ML/SL 7 Oct. 2025