भारतातील पहिला एआय कुंभ नाशिकमध्ये !

 भारतातील पहिला एआय कुंभ नाशिकमध्ये !

नाशिक, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतातील पहिला एआय कुंभ नाशिकमध्ये होणार असून त्या अनुषंगाने तंत्रज्ञान आणि परंपरेचा संगम साधणाऱ्या आगामी सिंहस्थासाठीच्या पहिल्या बिल्डथॉनचे नाशिकमध्ये औपचारिकरित्या उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन, कुंभथॉन इनोव्हेशन फाऊंडेशन आणि मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, यूएसए यांनी या उपक्रमाची सुरुवात केली.

कुंभमेळ्यात येणारा एकूणच अनुभव सुधारण्यासाठी त्यात उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून सगळ्यांना लाभ घेण्यासाठी ही अभिनव उपक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी बोलतांना गेडाम म्हणाले, ज्यामध्ये त्यांनी कुंभथॉनला “स्टार्टअप्स आणि नवोपक्रमांसाठी एक सर्वात मोठा सँडबॉक्स” म्हणून संबोधले. त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या संदर्भात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मिळणाऱ्या अनोख्या संधींवर भर दिला. त्यांनी चॅटबॉट उपक्रमाचे कौतुक केले आणि त्यात विविध साधने विकसित करण्याची आणि माहिती प्रभावीपणे प्रसारित करण्याची क्षमता असल्याचे नमूद केले. त्यांनी प्रशासन सतत रिअल टाईम माहिती पुरवून चॅटबॉट अपडेट करत राहील याची हमी दिली.

राज्य शासनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी पर्यावरण पूरक कुंभमेळा करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. त्यांनी हा कार्यक्रम जगातील सर्वात मोठा असा उपक्रम आहे म्हणून त्याचे महत्व अधोरेखित केले आणि नवोपक्रम तसेच स्टार्टअप्सना याकडे सामाजिक आणि समुदायाच्या संधीच्या दृष्टीने पाहण्याचे आवाहन केले. डॉ. रमेश रासकर यांनी पूर्वीचे अनुभव विशद करून सांगितले आणि त्या अनुषंगाने सहभागी विद्यार्थी आणि स्टार्टअप उद्योजकांना पारंपरिक मर्यादांपलीकडे आपली दृष्टी विस्तारण्याचे आवाहन केले. त्यांनी पूर्वीच्या परिषदांचे दाखले देऊन, अत्याधुनिक एआय साधनांवर सादरीकरण देखील केले.

या कार्यक्रमात दोन प्रमुख उद्घाटन झाले. एक म्हणजे कुंभथॉनची अधिकृत वेबसाइट (www.Kumbhathon.com) आणि कुंभ मेळ्यासाठी समर्पित एआय-सक्षम चॅटबॉट, ज्याचा उद्देश माहिती प्रसारण सुलभ करणे आहे.

नवोपक्रमांच्या आर्थिक बाजूंवर चर्चा

ऑक्सफर्ड विद्यापीठाचे कोर्स डायरेक्टर प्रा. अजित जावकर यांनी एआय आणि नवोपक्रमांवर शैक्षणिक दृष्टिकोन यावेळी विशद केले. एचडीएफसी क्रेडीला फायनान्शियल सर्व्हिसेसचे संस्थापक अजय बोहोरा यांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांमधील नवोपक्रमांच्या आर्थिक बाजूंवर चर्चा केली. अश्विन कंदोई आणि अशोका बिल्डकॉनचे अशिष कटारीया यांनी प्रशासन आणि नवोपक्रमकांच्या सहकार्याचे महत्त्व नमूद केले. कार्यक्रमात मोठ्या संधींचा शोध घेण्यासाठी आणि त्यांची पुष्टी करण्यासाठी ब्रेकआउट तंत्रांचा समावेश होता, ज्यामध्ये एआय असिस्टंट आणि त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभागी टीमला मार्गदर्शन केले.

कुंभथॉन २०२७ हा उपक्रमाचा एक भाग म्हणून बिल्डथॉनचा उद्देश विकेंद्रित एआयच्या शक्तीचा उपयोग करण्यात येणार असून ज्यामुळे नाशिकमध्ये अपेक्षित असलेल्या लाखो यात्रेकरूंच्या अनुभवांना नवे परिमाण देण्यासाठी आणि आव्हाने सोडविण्यास मदत होणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

PGB/ML/PGB
18 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *