प्रयागराजमध्ये १३ जानेवारी ते १६ फेब्रुवारीदरम्यान होणार कुंभमेळा

दर १२ वर्षांनी येणारा प्रयागराज येथे होणारा कुंभमेळा यंदा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या 450 दशलक्ष यात्रेकरू, संत आणि पर्यटकांच्या सहभागासाठी उत्तर प्रदेश सरकारने तयारी केली आहे. यंदाचा कुंभमेळा हा प्लास्टिक मुक्त असेल. तसेच कुंभमेळ्यादरम्यान पवित्र स्नान करणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी 35 विद्यमान कायमस्वरूपी घाट आणि 9 नवीन घाट बांधण्यात आले आहेत.
यूपी परिवहन निगमने या काळात सात हजार बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या मेळाव्यासाठी येणाऱ्या महिला आणि वृद्धांसाठी विशेष सुविधा देण्यात येणार आहे. त्याचं प्लानिंग सरकारने सुरू केलं आहे. महाकुंभ 2025 दरम्यान, 6800 परिवहन आणि 200 वातानुकुलित बसेच चालवल्या जाणार आहेत. महाकुंभ मेळाव्याचा मुख्य स्नानाचा कार्यक्रम 13 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 दरम्यान असणार आहे. त्यात मौनी अमावस्येचं शाही स्नान 29 जानेवारी रोजी आणि वसंत पंचमीचे शाही स्नान 3 फेब्रुवारी 2025 रोजी आहे.
Toggle panel: Yoast SEO