कुंभमेळ्याने उत्तर प्रदेशला केले मालामाल, तब्बल ३.५ लाख कोटींची उलाढाल

प्रयागराज, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोट्यवधी भाविकांची उपस्थिती लाभलेल्या महाकुंभमेळ्यामुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला चांगलीच उभारी मिळाली आहे. “महाकुंभाने जगाला श्रद्धा आणि अर्थव्यवस्थेचा चांगला समन्वय साधला आहे. एखाद्या शहराच्या विकासावर ७.५ हजार कोटी रुपये खर्च करून त्या राज्याची अर्थव्यवस्था ३.५ लाख कोटी रुपयांनी वाढते असे कधीच घडत नाही. हे जगात कुठेही दिसत नाही, पण महाकुंभाने ते करून दाखवले आहे, ” असे महत्त्वपूर्ण विधान ४५ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रयागराज कुंभमेळ्याच्या सांगते नंतर केले आहे.
आर्थिक तज्ज्ञांचा असाही अंदाज आहे की महाकुंभाला आलेल्या ६६ कोटी भाविकांनी सरासरी ५ हजार रुपये खर्च केले, जे एकूण ३.३० लाख कोटी रुपये होतात. अंदाजानुसार, महाकुंभमेळ्यादरम्यान भाविकांनी वाहतुकीवर १.५० लाख कोटी रुपये खर्च केले.
महाकुंभातून हॉटेल उद्योगाला सर्वाधिक उत्पन्न मिळाले. प्रयागराजमध्ये २०० हून अधिक हॉटेल्स, २०४ अतिथीगृहे आणि ९० हून अधिक धर्मशाळा आहेत. ५० हजारांहून अधिक लोकांनी त्यांच्या घरांचे होम-स्टेमध्ये रूपांतर केले होते.
टोलमधूनही विक्रमी कमाई
प्रयागराजला जाण्यासाठी एकूण ७ मार्ग आहेत. प्रत्येक मार्गावर टोल प्लाझा आहे. खाजगी वाहनांनी महाकुंभात आलेले सर्वजण टोल भरून आले होते. कुंभमेळ्यादरम्यान प्रयागराज-मिर्झापूर रस्त्यावरील विंध्याचल येथील टोल प्लाझावरून सुमारे ७० लाख वाहने गेली. यातून टोल प्लाझाने ५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले. त्याचप्रमाणे, प्रयागराज-रेवा, प्रयागराज-चित्रकूट, प्रयागराज-कानपूर, प्रयागराज-लखनऊ मार्गांवर टोल प्लाझा आहेत.लखनौ-प्रयागराज रस्त्यावर ३ टोल प्लाझा आहेत. एका कार मालकाला सुमारे ३५० रुपये द्यावे लागले. एकूण आकडेवारी जोडली तर असे दिसून येते की केवळ टोल प्लाझाकडून सुमारे ३०० कोटी रुपये मिळाले आहेत.
SL/ML/SL
2 March 2025