पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कृष्णजन्माष्टमी साजरी

सोलापूर, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठल हे श्रीकृष्णाचे रूप मानले जाते. याच विठ्ठलावर कृष्णजन्माष्टमी निमित्त बुधवारी रात्री बारा वाजता परंपरेप्रमाणे गुलाल उधळून उत्सव साजरा करण्यात आला. विठ्ठलास रेशमी भरजरी कुंची परिधान करण्यात आली. लोण्याच्या गोळ्याचा नैवेद्य दाखवण्यात आला. त्यानंतर मंदिरातील मुख्य सभामंडपामध्ये श्रीकृष्णाचा पाळणा देखील झाला. गोकुळाष्टमीच्या उत्सवानिमित्त मंदिरामध्ये भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. भजन, कीर्तन, हरीगजर अशा पारंपारिक आणि धार्मिक कार्यक्रमाने कृष्ण जन्माष्टमी विठ्ठल मंदिरामध्ये रात्री उशिराने संपन्न झाली.
ML/KA/SL
7 Sept. 2023