भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने कोथिंबीरवर चालवला ट्रॅक्टर…

जालना दि २४:– जालन्यात कोथिंबीरला योग्य भाव मिळत नसल्याने एका शेतकऱ्याने आपल्या एका एकरवरील कोथिंबीरवर ट्रॅक्टर चालवला आहे. बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील शेतकरी सुनील मदन यांनी कोथिंबीरला भाव नसल्याने एक एकरावर लागवड केलेल्या कोथिंबीर पिकावर ट्रॅक्टर चालवला आहे.
मदन यांनी काही दिवसांपूर्वी एक एकर क्षेत्रावर कोथिंबीरची लागवड केली होती. मात्र, बाजारात कोथिंबीरला भाव मिळत नसल्याने लावलेला खर्च देखील निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे संकटात पडलेल्या शेतकरी मदन यांनी टोकाचे पाऊल उचलत एका एकरावरील कोथिंबीर पिकावर ट्रॅक्टर चालवत कोथिंबीर पीक उध्वस्त केलंय. ML/ML/MS