कोटक महिंद्रा बँकेने वाढवले एफडीचे दर
![कोटक महिंद्रा बँकेने वाढवले एफडीचे दर](https://mmcnewsnetwork.com/wp-content/uploads/2023/10/Kotak.jpg)
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
मुंबई :
वर्ष अखेर जवळ आल्यामुळे ग्राहकांना खूश करण्यासाठी बँका ठेवीवर विशेष योजना जाहीर करत आहेत. नुकतेच BoIने आपल्या FD दरात सुधारणा जाहीर केली होती. त्यानंतर आता कोटक महिंद्रा बँकेने एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. कोटक बँकेने 3 वर्षे आणि त्यावरील परंतु 4 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्याच वेळी 4 वर्षांपेक्षा जास्त परंतु 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात 0.75 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. नवीन दर 11 डिसेंबर 2023 पासून लागू झाले आहेत.
कोटक बँकेचे नवे दर
- 7 दिवस ते 14 दिवस – सामान्य लोकांसाठी: 2.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 3.25 टक्के
- 15 दिवस ते 30 दिवस – सामान्य लोकांसाठी: 3.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 3.50 टक्के
- 31 दिवस ते 45 दिवस – सामान्य लोकांसाठी: 3.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 3.75 टक्के
- 46 दिवस ते 90 दिवस – सामान्य लोकांसाठी: 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 4.00 टक्के
- 91 दिवस ते 120 दिवस – सामान्य लोकांसाठी: 4.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 4.50 टक्के
- 121 दिवस ते 179 दिवस – सामान्य लोकांसाठी: 4.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 4.75 टक्के
- 180 दिवस – सामान्य लोकांसाठी: 7 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.50 टक्के
- 181 दिवस ते 269 दिवस – सामान्य लोकांसाठी: 6 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.50 टक्के
- 270 दिवस – सामान्य लोकांसाठी: 6 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.50 टक्के
- 271 दिवस ते 363 दिवस – सामान्य लोकांसाठी: 6 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.50 टक्के
- 364 दिवस – सामान्य लोकांसाठी: 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7 टक्के
- 365 दिवस ते 389 दिवस – सामान्य लोकांसाठी: 7.10 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.60 टक्के
- 390 दिवस (12 महिने 25 दिवस) – सामान्य लोकांसाठी: 7.15 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.65 टक्के
- 391 दिवस ते 23 महिन्यांपेक्षा कमी – सामान्य लोकांसाठी: 7.20 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.70 टक्के
- 23 महिने – सामान्य लोकांसाठी: 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.75 टक्के
- 23 महिने 1 दिवस ते 2 वर्षांपेक्षा कमी – सामान्य लोकांसाठी: 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.75 टक्के
- 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी – सामान्य लोकांसाठी: 7.10 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.60 टक्के
- 3 वर्षे आणि अधिक परंतु 4 वर्षांपेक्षा कमी – सामान्य लोकांसाठी: 7 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.60 टक्के
- 4 वर्षे आणि अधिक परंतु 5 वर्षांपेक्षा कमी – सामान्य लोकांसाठी: 7 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.50 टक्के
- 5 वर्षे आणि त्याहून अधिक आणि 10 वर्षांपर्यंत – सामान्य लोकांसाठी: 6.20 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.70 टक्के.
SL/KA/SL
11 Dec. 2023