कोसिया आणि टीसा चे कौशल्य प्रशिक्षण शिबिर

 कोसिया आणि टीसा चे कौशल्य प्रशिक्षण शिबिर

ठाणे, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन (टिसा) व चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्स (कोसिआ) यांच्या वतीने गेल्या 7 वर्षांपासून समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू तरुण व तरुणींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत असून ह्या कार्यक्रमाचे मुख्य धेय्य रोजगार निर्मिती करणे,रोजगार वाढविणे व प्रशिक्षणार्थीला उद्योगाशी निगडित संपूर्ण व्यावहारिक ज्ञान देणे व त्यांच्या मध्ये रोजगाराभिमुक कौशल्य निर्माण करणे हा ह्या प्रशिक्षणामागचा मुळ हेतू आहे.Kosia and Tisa’s Skill Training Camp

आता पर्यंत सुमारे ४ हजाराहून अधिक युवक व युवतींनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला असून त्यातील अनेकांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केले आहेत किंवा काही जणांनी नोकऱ्या मिळवल्या आहेत .Kosia and Tisa’s Skill Training Camp

कौशल्य प्रशिक्षणाअंतर्गत असलेलले कोर्सेस :- अकॉउंटस असिस्टंट टॅली ऑपरेटर, टॅली जीएसटी सह संपूर्ण अकॉउंटिंग आणि टँक्सेशन कालावधी २ महिने प्रत्येक दिवशी २ तास असून बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम १ महिण्याचाआहे त्यात विविध प्रकारचे केक्स,बिस्कीट्स व ब्रेड,नानकटाई,चॉकलेट्स,लादी पाव,बेसिक आयसिंग इत्यादी शिकवले जाते त्याशिवाय बेसिक टेलरींग (त्यात विविध प्रकारचे डिझाईन आणि ब्युटीपार्लर कोर्स तयार करण्यात आला आहे .

एका बॅच मध्ये साधारण पणे 25 प्रशिक्षणार्थी असतात. सदर कौशल्य विकास प्रशिक्षण कल्याण, डोंबिवली , ठाणे , कांदिवली ,चेंबूर ह्या ठिकाणी विविध केंद्रावर होत असून प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यावर कोसीआ ह्या अखिल भारतीय शिखर संस्थेच्यावतीने तसेच स्थानिक केंद्रातर्फे सर्टिफिकेट प्रदान करण्यात येते.

संस्थे तर्फे वरील सर्व विषयाचे प्रशिक्षण तज्ञांद्वारे दिले जात असून त्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण शुल्क प्रशिक्षणार्थीकडून आकारले जात नाही परंतु कोर्सच्या अटी व शर्तीचे पालन करणे आवश्यक आहे. ज्या तरुण ,तरुणींना ह्या कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोशिएशनच्या टीसा हाऊस, रोड नंबर १६, प्लॉट नंबर पी २६ वागळे इंडस्ट्रियल इस्टेट येथील भ्रमणध्वनी क्रमांक 7718879254 कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधून नोंदणी करावी असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

ML/KA/PGB
27 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *