कोरटकरच्या जामीनावर 9 एप्रिलला निकाल,सुनावणी पूर्ण

कोल्हापूर दि ७ — छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह राजमाता जिजाऊंबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामिनावर 9 एप्रिल रोजी निकाल देण्यात येणार आहे. न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन निकाल राखून ठेवला आहे, 12 एप्रिलला कोरटकरची न्यायालयीन कोठडी संपणार आहे, त्यापूर्वी न्यायालय त्याला जामीनावर मुक्त करणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागला आहे.
न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांच्यासमोर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्याकडून बाजू मांडताना कोरटकरने पहिल्यांदा कॉल केला तेव्हा इंद्रजीत सावंत यांनी उचलला आणि कट केला, त्याने परत कॉल केला आणि जेव्हा वेगळी भाषा बोलू लागला तेव्हा इंद्रजीत सावंत यांनी कॉल रेकॉर्ड केला मात्र कोरटकरने मोबाईल पोलिसांकडे सुपूर्द केला तेव्हा त्यातील डेटा त्याने डिलीट केला. त्याने महत्वाचा पुरावा नष्ट केला, त्याने माझ्या जीवाला धोका आहे मला पोलिस सुरक्षा हवी म्हणाला त्याला सुरक्षा देण्यात आली तरीही त्याने इतके पोलिस असताना पळून गेला.
कोरटकरला असा कोणता मुद्दा ऐकून वाईट वाटले की त्याने धमकी दिली हे ते सांगत नाहीत, बाहेर कोरटकरवर हल्ले करण्याचा प्रयत्न होत आहे, त्याला चप्पल दाखवण्यात आले वकिलाने हल्ला केला, सध्या कोरटकर जेल मध्येच सुरक्षित आहे त्यामुळे त्याचा जामीन मंजूर करू नये असा युक्तिवाद ऍड. असीम सरोदे यांनी केला तर यावर जोरदार आक्षेप घेत कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी घेतला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन प्रशांत कोरटकरच्या जामीनावर 9 एप्रिलपर्यंत निकाल राखून ठेवला आहे.
कोरटकरने महापुरुषांबद्दल वक्तव्य केल्यानंतर तो तब्बल महिनाभर फरार होता, या काळात त्याला प्रशिक पडवेकर याने त्याला रोख दीड लाख रुपयांची मदत केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाला आहे, यामुळे कोरटकरला सहकार्य केलेल्या साथीदारांचा तपास होणे गरजेचे असल्याने त्याला जामीन मिळू नये, कारागृहात सुरक्षित असल्याचं आणि तपास अपूर्ण असताना जामिनासाठी घाई-गडबड का केली जात आहे असा सवाल इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी उपस्थित केला आहे.