कोपरखैरणेतील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळला; 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, 12 विद्यार्थी व शिक्षिका रेस्क्यू.
मुंबई, दि ५
नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 2, प्लॉट नंबर 12 येथील विद्या भवन सोसायटीमध्ये गुरुवारी सायंकाळी सुमारे 5.20 वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. तळमजल्यावर घरगुती क्लास सुरू असताना पहिल्या मजल्यावरील स्लॅब अचानक कोसळला.
घटनेची माहिती मिळताच वाशी, कोपरखैरणे आणि ऐरोली येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने तत्काळ बचावकार्य हाती घेत मलब्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले.
अग्निशमन विभागाने एकूण 12 विद्यार्थी आणि 1 शिक्षिका अशा 13 जणांना सुरक्षित बाहेर काढले. यापैकी चार ते पाच विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र उपचारादरम्यान मनीष मसे (वय 14) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती वाशी मनपा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रेस्क्यू करण्यात आलेल्यांची नावे :
सिद्धांत गुप्ता (वय 8)
प्रिन्स सोनी (वय 11)
आयशा
कुसुम (वय 15)
निष्का धनवाडे (वय 14)
मनीष मसे (वय 14)
आराध्या बोडसे (वय 14)
तन्वी श्रीवास्तव (वय 7)
देवांश पुजारी (वय 12)
राजदीप वानखेडे (वय 10)
पार्थ खैरनार (वय 14)
रुद्र येलूरकर (वय 5)
शिक्षिका शामली चौधरी (वय 53). AG/ML/MS