ग्रामदैवत श्री भैरी मंदिरात पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगला…

रत्नागिरी दि १४:– कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. फाल्गुन पोर्णिमेच्या मध्यरात्री मिऱ्या येथील ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगला. सडामिर्या आणि जाकिमिऱ्या येथील श्री देवी नवलाई पावणाई आणि म्हसोबा ग्रामदेवतेच्या पालख्यांची भेट झाली. रत्नागिरीच्या ग्रामदैवत श्री भैरी मंदिरात हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली. वर्षातून एक वेळ होणारी भेट पाहण्यासाठी भाविक आतुर असतात. ढोल ताशांच्या गजरात डोळ्याचे पारणे फेडणारा पालखी भेटीचा सोहळा यंदाच्या होळीनिमित्ताने अनुभवायला मिळाला. या पालखी भेटीनंतर रत्नागिरी शहरातील शिमगोत्सवाला खऱ्या अर्थाने सुरवात होते.