दरडीमुळे कोकण रेल्वे ठप्प

 दरडीमुळे कोकण रेल्वे ठप्प

रत्नागिरी, दि १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकण रेल्वे मार्गावर खेड दिवाणखवटी नातुवाडी बोगद्या नजिक माती आणि दगड रेल्वे रुळांवर आल्यामुळे मागील दीड तासांपासून येथील वाहतूक थांबवण्यात आली आहे. येथील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागू शकतो. अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली आहे.

मुंबई कडे जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात थांबवली. श्री गंगानगर एक्सप्रेस कामथे स्थानकात, तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस रत्नागिरी तर सावंतवाडी दिवा गाडी दिवाणखवटी स्थानकात थांबून ठेवण्यात आली आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *