कोकण रेल्वे अद्याप ठप्पच

 कोकण रेल्वे अद्याप ठप्पच

कोकण रेल्वे अद्याप ठप्पच

रत्नागिरी, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खेड दिवाणखवटी येथे कोकण रेल्वे मार्गावर माती आल्यामुळे कोकण रेल्वे मार्ग बंद झाला आहे. मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात चिखलयुक्त माती रेल्वे ट्रॅक वर आली. त्यामुळे हा मार्ग सुरू होण्यासाठी विलंब लागत आहे .

काल सुटलेल्या 12052 जनशताब्दी एक्सप्रेस ,22120 तेजस एक्सप्रेस , 20112 कोकण कन्या एक्सप्रेस आणि 1100 तुतारी एक्सप्रेस या गाड्या रत्नागिरी पर्यंत आणून रद्द करण्यात आलेल्या आहेत. आज सुटणाऱ्या काही गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे. यामध्ये 11100 मडगाव एलटीटी मडगावहून सायंकाळी सहा वाजून 30 मिनिटांनी सुटेल. 12052 मडगाव सीएसटीएम जनशताब्दी एक्सप्रेस मडगावहून रात्र आठ वाजून तीस मिनिटांनी सुटेल.20112 मडगाव सीएसटीएम कोकण कन्या एक्सप्रेस मडगावहून आज रात्र अकरा वाजून 30 मिनिटांनी सुटेल तर 11004 सावंतवाडी दादर तुतारी एक्सप्रेस सावंतवाडीहून रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी सुटेल. Konkan Railway is still at a standstil

ML/ML/PGB
15 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *