कोळी” नावाखाली आदिवासी जमातीचे अस्तित्व पुसण्याचा डाव थांबवा
दत्ताभाऊ सुरवसे
मुंबई, दि २३
कोळी’ हे जातीचे खरे नाव नाही. त्यामध्ये अनेक उपविभाग असून कोळी नावाखाली आदिवासी जमातींचे अस्तित्व पुसण्याचे डाव थांबवावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलन करते दत्ताभाऊ सुरवसे यांनी सीएसटी येथे आझाद मैदान येथे आंदोलन सुरू करून दिला. जणगणना-1911 व्हॉल्यूम-7, बॉम्बे, पार्ट-1. च्या पृष्ठ क्र. 227 वर सुस्पष्ट नमुद आहे. त्यामुळे कोळी हा शब्द केवळ एक आल नसून तो अनेक आदिवासी जमातीचा समूह आहे. त्यामध्ये कोळी महादेव किवा डोंगर कोळी, ढोर कोळी किंवा टोकरे कोळी व कोळी मल्हार या जमाती ऐतिहासिकदृष्ट्या आदिवासी कोळी समुहाचे अविभाज्य घटक आहेत. या जमाती 1950 पूर्वीपासून मा. राष्ट्रपती महोदयांच्या यादीमध्ये स्पष्टपणे आदिवासी म्हणून अस्तित्वात आहेत, याचे असंख्य मानववंशशास्त्रीय व ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. या सत्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आदिवासी जमातीवर आदिवासी विकास विभाग शासन निर्णय दिनांक 24 एप्रिल 1985 मांध्ये 1950 पूर्वीच्या मानववंशशास्त्रीय पुराव्यांचा पुरेसा विचार न करता, या स्वतंत्र जमाती आहेत, या जमातीचा कोळी जमातीशी काहीही संबंध नाही असे अन्यायकारक लेखन शासनाकडून झाल्याने जमातीवर अन्याय होत आहे. हा अन्याय घटनात्मक अधिकारावर घाला असून, आता तो सहन केला जाणार नाही. यामुळे हजारो आदिवासी कुटुबे जात पडताळणी, शिक्षण, नोकरी, आरक्षण, विकास योजनांपासून वंचित राहत आहेत
अनुसूचित जमात’ आदेश जारी होण्यापूर्वी म्हणजे १९५० पूर्वी, या सर्व अनुसूचित जमाती गटाच्या शालेय व महसुली नोदी फक्त ‘कोळी म्हणूनच नॉद झाल्या आहेत हे नाशिक अनुसूचित जमात प्रमाणपत्र पडताळणी (तज्ज) समितीने प्रकरण क्रमांक ३-ST/2009/15661 दिनांक १९ ऑक्टोबर २००९ (रघुनाथ लक्ष्मण वाघमारे) मध्ये स्पष्ट करून मान्य केले आहे.
मा. उच्च न्यायालय औरगाबाद खंडपीठकीत प्रभू नारावण सुरवसे विरुध्द महाराष्ट्र शासन रिट याचिका क्र. १९०७/२००३ दिनांक १२०० परिच्छेद 11(C) ध्व शाळेच्या नौदीमध्ये, “कोही असा उल्लेख असल्यामुळे उमेदवाराचा दावा नाकारता येत नाही असे सुस्पष्ट केले आहे तसेच मा. औरंगाबाद उच्च न्यायालयाचा आदेश दि डिसेंबर २०२३ (WP 2434/2022) मधील परिच्छेद आक १० मध्ये याची पुनरावृत्ती झालेली आहे.
कोळी हा अनेक जमातीचा समूह असल्याने, कोळी महादेव किया डोगर कोळी, डोर कोळी किंवा टोकरे कोळी व कोळी मल्हार वा अनुसूचित जमाती आदिवासी कोळी समुहराचे पार्ट/ग्रुप असल्याबाबत महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 24 एप्रिल 1985 मध्ये 1950 पूर्वीच्या मानववंशशास्त्रीय पुराव्यानुसार आवश्यक सुधारणा कराव्यात
कोळी महादेव किंवा डोगर कोळी, दौर कोळी किंवा टोकरे कोळी, कोळी मल्हार त्या अनुसूचित जमातीच्या गटाचे दावे १९५० पूर्वीच्या महसूली व शालेय ‘कोळी’ नोंदीव्दारे नाकारले जाऊ नयेत मासाठी तात्काळ शासन निर्णय जारी करावे.
आदिवासी उपयोजना क्षेत्र (TSP) व आदिवासी उपयोजना बाहय क्षेत्र (OTSP) मधील वरील अनुसूचित जमातीच्या 1960 पूर्वीच्या शालेय व महसुली नांदीची पडताळणी करण्यासाठी, कोर्ट कमिशन नेमण्यात यावा त्या अहवालाच्या आधारे नोदीच्या बाबतीत सत्य परिस्थिती विचारात घेवून सर्वांना समान न्याय देण्यात यावा
महाराष्ट्र राज्यातील सर्व जात पडताळणी समित्यांचे कामकाज पारदर्शक व निःपक्षपाती राहावे यासाठी, सर्व जात पडताळणी समित्यांचे निर्णय व दक्षता पथकाचे अहवाल TRTI च्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात यावेत व ते सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले ठेवण्यात यावेत.
राज्य शासनाने या न्याय्य मागण्यांकडे तात्काळ लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा हे आंदोलन करण्यात येईल अशी माहिती आंदोलनकर्ते दत्ताभाऊ सुरवसे यांनी केली आहे. KK/ML/MS