कोल्हापुरी चप्पलेची नक्कल केल्याबद्दल सोशल मिडियावर संताप

मुंबई, दि. २५ : महाराष्ट्राची शान असलेल्या कोल्हापूरी चप्पल सारखी चप्पल एका आंतरराष्ट्रीय ब्रँड ने तयार केल्याने सोशल मिडियावर वादाला तोंड फुटले आहे. कोल्हारी चप्पलची डिझाईन नक्कल केल्याचा आरोप नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे.इटलीच्या लग्जरी फॅशन ब्रँड प्राडा (Prada) च्या नविन कलेक्शनमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. प्राडाने अलीकडेच मिलान (Milan) मध्ये आपले Men’s Spring/Summer 2026 कलेक्शन सादर केले. या शोमध्ये मॉडेल्सच्या पायात जी चप्पल दिसली, ते अगदी भारतातील प्रसिद्ध ‘कोल्हापुरी चप्पल’सारखी होती. या चप्पलांची किंमत जवळपास 1 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे, तर भारतात अशीच चप्पल सुमारे 250 रुपये ला सहज मिळते.
‘कोल्हापुरी चप्पल’ (kolhapuri slippers) ही कोल्हापूरची खास ओळख आहे. या हाताने तयार केल्या जाणाऱ्या लेदर चप्पल असतात. काही भारतीय फॅशन क्षेत्रातील जाणकारांना आनंद झाला की देसी डिझाईनला आंतरराष्ट्रीय फॅशनमध्ये स्थान मिळालं. पण अनेकांना याचा राग आला आहे कारण प्राडाने कुठेही या चप्पलांचा भारतीय इतिहास किंवा त्याच्या मूळाबद्दल काहीही उल्लेख केला नाही.
एका युजरने म्हटलं, “जर आपण आपल्या संस्कृतीचा सन्मान केला नाही, तर कोणी तरी दुसरं करेल. प्राडा आता कोल्हापुरी चप्पल शेकडो डॉलरमध्ये विकते आहे, पण आपल्या कारागिरांना ना क्रेडिट मिळतंय, ना योग्य मोबदला.”