चंबळच्या खोऱ्यात कोल्हापूर पोलिसांचे बळ

कोल्हापूर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दरोडेखोरांमुळे कुख्यात असलेल्या मध्य प्रदेशातील चंबळच्या खोऱ्यात आठ दिवस तळ ठोकून कोल्हापूर पोलिसांनी बालिंगा इथल्या कात्यायनी ज्वेलर्स दरोड्यातील शार्प शूटरला अटक केली आहे. Kolhapur police strength in Chambal valley त्याच्याकडून दोन पिस्तुलांसह 16 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
कोल्हापूर पोलिसांच्या धाडसी कामगिरीमुळे मध्यप्रदेश पोलिसांच्या रेकॉर्डवरील इनामी वॉन्टेड गुन्हेगार अंकित उर्फ छोटू श्रीनिवास शर्मा हाती लागला आहे. त्याच्या अटकेमुळे बालिंगा दरोड्यातील अन्य तीन परप्रांतीय आरोपीचाही शोध लागणार आहे असे जिल्हा पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ML/KA/PGB
12 Sep 2023