ट्रॅक्टर ट्रॉली पुरात पलटली, दोन जण बेपत्ता

कोल्हापूर, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील पुरामध्ये ट्रॅक्टर ट्रॉली उलटून त्यातील सात जण वाहून गेले त्यापैकी पाच जणांचा शोध लागल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे. अकिवाट – बस्तवाड दरम्यानच्या रस्त्यावर ट्रॅक्टर ट्रॉली महापुराच्या पाण्यात पलटी झाली होती त्यातील पाच जण सुखरूप असून दोन जण बेपत्ता आहेत, पाच पैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
ML/ ML/ SL
2 August 2024