ऊस गाळपात कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल
कोल्हापूर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात आतापर्यंत सुमारे ९५२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून राज्यातील ऊस हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.
फेब्रुवारी अखेर राज्यात ९५९ लाख मॅट्रिक टन उसाचं गाळप झालं असून ९५१.७५ लाख क्विंटल साखर उत्पादन झालं आहे.
सरासरी आठ लाख क्विंटल साखर उत्पादन घटलं आहे. राज्यात एकूण साखर उतारा ९.९१ टक्के आहे.
कोल्हापूर विभाग
ऊस गाळप आणि साखर उताऱ्यात राज्यात प्रथम क्रमांकावर असून इथला साखर उतारा ११.४१ टक्के इतका आहे. तर नागपूर विभागाचा ७.४३ टक्के साखर उतारा आहे.
चालू गळीत हंगामात राज्यात १०२ सहकारी आणि १०२ खासगी
अशा २०४ कारखान्यांनी हंगाम सुरू केला. गतवर्षी १९३ कारखाने सुरू
झाले होते. पण त्यामध्ये ११ कारखान्यांची भर पडली आहे. हंगाम सुरू होऊन चार महिने पूर्ण झाले आहेत.
यावर्षी गाळपासाठी
साधारणपणे ११०० ते १२०० लाख मेट्रिक टन ऊस मिळेल, असा अंदाज आहे. सध्या उपलब्ध उसाची आकडेवारी पाहता कारखाने आणखी
१५ दिवस चालतील, अशी शक्यता आहे.
कोल्हापूर विभागातील खासगी आणि सहकारी अशा ३६ कारखान्यांनी
गाळप हंगाम घेतला होता.
फेब्रुवारी अखेर २१९.१८ लाख टन गाळप झालं. यातून २५०.१५ लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालं आहे. उतारा
११.४१ टक्के आहे.
कोल्हापूर विभागातील ५ साखर कारखान्यांनी आपला गळीत हंगाम
थांबवला आहे. तर, सोलापूरमधील
१३, पुणे २, अहमदनगर ३, नांदेड २ असे २५ कारखाने बंद झाले आहेत.Kolhapur district tops the state in sugarcane siltation
ML/KA/PGB
4 Mar. 2023