कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला, पूरस्थिती जैसे थे

 कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला, पूरस्थिती जैसे थे

कोल्हापूर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापुरात १४ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यातील ७४
बंधाऱ्यांवर अद्याप पाणी आहे.
सुमारे २०० हून अधिक गावांची वाहतूक मार्गावर पाणी असल्याने अद्याप विस्कळीतच आहे. पंचगंगा नदी आज सकाळी सात वाजता ४१.८ फुटांवर होती. धोका पातळी 43 फूट आहे .

आज कोल्हापूर जिल्ह्यासाठी पावसाचा यलो अलर्टच दिला आहे. आज पहाटे 2.10 वाजता राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्रमांक 5 बंद झालं आहे. धरणाचे एकूण दोन दरवाजे क्रमांक 6 आणि 7 उघडले आहेत. यातून 2 हजार 856 क्यूसेक्स आणि BOT पॉवर हाऊस मधून 1 हजार 500 क्यूसेक्स असा एकूण 4 हजार 356 क्यूसेक्स इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे. नदी काठच्या लोकांनी दक्षता घेण्याची सूचना देण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख १६ धरणांपैकी आंबेओहोळ आणि चिकोत्रा वगळता उर्वरित १४ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली. राधानगरी (१०३), सर्फनाला (१०८) तर घटप्रभा (१३०) या तीन धरणक्षेत्रात धुवाँधार पाऊस झाला. धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसानं धरणातील पाणीसाठ्यातही वाढ होत
आहे. परिणामी धरणातील विसर्गही सुरू होता.

राधानगरी सह तुळशीतून 1500.कासारी आणि कडवीतून प्रत्येकी ६७०, कुंभीतून ३०० तर कोदेतून ९३६ क्युसेक्स असा एकूण ९ हजार ८६० क्युसेक्स धरणातील पाण्याचा विसर्ग पंचगंगेत सुरूच आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी २१.९ मि.मी. पाऊस झाला. सर्वाधिक ३२.९ मि.मी. पावसाची पन्हाळा तालुक्यात नोंद झाली. भुदरगडमध्ये ३२.५,शाहूवाडीत ३२, आज-यात ३१.१, गगनबावड्यात २९.६, चंदगडमध्ये २५.२, राधानगरीत२४.९, करवीरमध्ये २०.४, गडहिंग्लजमध्ये ११.६ तर शिरोळ तालुक्यात ५.६ मि.मी. पावसाची नोंद झाली.

ML/ML/PGB
4 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *