घरोघरी मिळतोय अनिल कोकिळ यांच्या प्रचाराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद
मंबई, दि १२
शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआय मित्र पक्ष महायुती प्रभाग क्रमांक 204 मधील अधिकृत उमेदवार अनिल कोकिळ यांच्या प्रचाराला लालबाग परिसरात घरोघरी उदंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक वयोवृद्ध महिला त्यांची आरती आणि ओवाळणी करून त्यांना शुभ आशीर्वाद देत आहेत. यावेळी प्रत्येक मतदारांमध्ये एक आगळी वेगळी स्फूर्ती दिसून आली. अनेक मतदारांनी स्थानिक उमेदवार माजी नगरसेवक अनिल कोकिळ यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन यापुढे पण आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही बिनधास्त तयारीला लागा असे नागरिकांना कोकिळ यांना आश्वासन दिले.अनिल कोकिळ यांनी आपल्या भाषणामध्ये आपण केलेल्या कामांचा आढावा मांडला. लोकांचा मला यापूर्वी ही प्रचंड असा प्रतिसाद मिळाला होता.
मी प्रभागातील नागरिकांसाठी 24 तास उपलब्ध असतो रात्रीही मला दोन,तीन वाजता रुग्णांचे फोन येतात.त्यावेळेस मी त्यांना रुग्णालयात ऍडमिट करण्यासाठी देखील मदत केलेली आहे. कोविड काळामध्ये मी रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम केले आहे. त्यामुळे लोक माझ्या मागे गंभीरपणे उभे राहतील. शिवसेनेचे परळ विभागाचे माजी आमदार दगडू दादा सकपाळ यांनी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे लालबाग परळमधील संपूर्ण प्रभागांमध्ये नवचैतन्य संचारलेले आहे. ते देखील स्वतः माझ्यासाठी घरोघरी प्रचारासाठी उतरलेले आहेत. त्यामुळे या प्रभागामध्ये आता शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
आपल्या विभागामध्ये मला अजून जोराने काम करायचे आहे. त्यासाठी तुम्ही मला प्रचंड मतांनी निवडून द्याल असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. विशेष म्हणजे प्रचाराला आलेल्या प्रत्येक कार्यकर्ते व मतदारांचे एकच म्हणणे होते अनिल कोकिळ हे प्रत्येक सुखदःखामध्ये नेहमीच सर्वांच्या आधी हजर असतात, त्यामुळे आम्ही तुम्हाला भरघोस मतांनी निवडून देऊ अशी घोषणा कार्यकर्त्यांनी या प्रचार फेरीमध्ये केली.KK/ML/MS