अनिल कोकिळ यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 अनिल कोकिळ यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मंबई, 6
शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआय मित्र पक्ष महायुती प्रभाग क्रमांक 204 मधील अधिकृत उमेदवार अनिल कोकिळ यांच्या प्रचाराला लालबाग परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रचार फेरमध्ये भाजप नेत्या चित्राताई वाघ, भाजपा जिल्हाध्यक्षा शलाकाताई साळवी आणि इतर महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रचारामध्ये विभागातील नागरिक व कार्यकर्ते यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता प्रत्येक मतदारांमध्ये एक आगळी वेगळी स्फूर्ती दिसून आली. अनेक
मतदारांनी स्थानिक उमेदवार माजी नगरसेवक अनिल कोकिळ यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन यापुढे पण आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही बिनधास्त तयारीला लागा असे मतदाराने आश्वासन दिले.अनिल कोकिळ यांनी आपल्या भाषणामध्ये आपण केलेल्या कामांचा आढावा मांडला व यापुढेही मला भरघोस मतांनी
निवडून द्या अशी आशा व्यक्त केली. लोकांचा मला यापूर्वी ही प्रचंड असा प्रतिसाद मिळाला होता. आता पण तुम्ही माझ्यामागे अशाच प्रकारे उभे राहून मला भरघोस मतांनी विजयी करून द्या अशी ग्वाही अनिल कोकिळ यांनी दिली.
मी प्रभागातील नागरिकांसाठी 24 तास उपलब्ध असतो रात्रीही मला दोन,तीन वाजता रुग्णांचे फोन येतात.त्यावेळेस मी त्यांना रुग्णालयात ऍडमिट करण्यासाठी देखील मदत केलेली आहे. कोविड काळामध्ये मी रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम केले आहे.
आपल्या विभागामध्ये मला अजून जोराने काम करायचे आहे. त्यासाठी तुम्ही मला प्रचंड मतांनी निवडून द्याल असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. विशेष म्हणजे प्रचाराला आलेल्या प्रत्येक कार्यकर्ते व मतदारांचे एकच म्हणणे होते अनिल कोकिळ हे प्रत्येक सुखदःखामध्ये नेहमीच सर्वांच्या आधी हजर असतात, त्यामुळे आम्ही तुम्हाला भरघोस मतांनी निवडून देऊ अशी घोषणा कार्यकर्त्यांनी या प्रचार फेरीमध्ये केली.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *