माणिकराव कोकाटेंकडून कृषी खाते काढलं , आता ते क्रीडामंत्री….

मुंबई दि १– महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड झाली असून वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटे यांना त्याचा फटका बसला असून त्यांच्याकडील कृषी खाते काढून त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्य विकास आणि औकाफ हे खाते देण्यात आले आहे. कोकाटे यांचे कृषी खाते आता दत्तात्रय मामा भरणे यांच्या कडे सोपविण्यात आले आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या वेळी सभागृहात मोबाईलवर पत्त्त्यांचा रमी गेम खेळणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी जोर धरली होती. मात्र कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांच्याकडून कृषी खाते काढून नवीन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. काल दिवसभर झालेल्या अनेक राजकीय घडामोडीनंतर रात्री उशिरा हा आदेश जारी करण्यात आला आहे.
कृषी मंत्रीपद माणिकराव कोकाटे यांच्याकडून काढण्यात आले असून त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण खाते दिलं आहे. कोकाटे यांच्या जागी दत्तात्रेय भरणे यांची कृषिमंत्रीपदी वर्णी लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये गुरुवारी 31 जुलैला बैठक झाली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला. सरकारने या दोन मंत्र्यामध्ये खात्यांची अदलाबदली केली आहे. ML/ML/MS