कोकणात घराघरात गणपती बाप्पाचे आगमन…

रत्नागिरी दि २७:– कोकणातील गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. या ठिकाणी घरगुती गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर रत्नागिरी जिल्ह्यात घरोघरी गणपती आगमन होत आहे. अनेक ठिकाणी पारंपारिक पद्धतीने गणपती बाप्पाचे आगमन होते. पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात डोक्यावरून तसेच शेतातून पायी मूर्ती आणण्याची परंपरा आजही गावोगावी जपली जाते. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्ये पासून तसेच आज सकाळपासून गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन येतात. भक्ती पूर्ण वातावरणातील हे विहंगमय दृश्य डोळ्याचे पारणे फेडते.ML/ML/MS