कोकम कडी, सोप्पी रेसिपि

 कोकम कडी, सोप्पी रेसिपि

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मालवणी किंवा असली कोकणी माणूस मच्छीच्या जेवणानंतर कोकमकढी बरोबर भात जेवल्याशिवाय उठतच नाही. त्यामुळे दोन गोष्टी साध्य होतात. मच्छीचा वास तोंडाला राहत नाही आणि जेवण व्यवस्थित पचते. कोकम कढी चार-पाच प्रकारे केली जाते त्यातील हिरव्या मिरची आणि हिंगाची कढी आज आपण पाहूया जी उपासाच्या जेवणासाठी सुद्धा चालू शकते.

घटक
१५ मिनिटे

10-12 कोकमं
1 कमी तिखट असलेली हिरवी मिरची
1 चमचा साखर
2 वाट्या ओले खोबरे
1/4 चमचा हिंग
4 वाट्या कोमट पाणी
मीठ चवीप्रमाणे
1 सुकी मिरची व कोथिंबीर सजावटीसाठी

प्रथम कोकम, मीठ, साखर, हिंग थोड्या पाण्यात भिजत घालावे. नंतर हिरवी मिरची चिमट्याने पकडून गॅसवर भाजून घ्यावी.

आता खोबरं,मिरची, २ वाट्या कोमट पाणी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.
नंतर भिजत घातलेल्या कोकमाच्या भांड्यावर मोठी गाळणी ठेवून खोबऱ्याचे वाटण त्यावर घालून खोबऱ्याचा नीट रस काढून घेऊन घ्यावा आणि वाटण पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालून उरलेले दोन वाट्या पाणी घालून पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यावे.

खोबऱ्याचा रस आणि भिजवलेले कोकम अर्धा तास तसेच ठेवून नंतर सुखी मिरची आणि कोथिंबीरीने सजवून सर्व्ह करावी.

ML/ML/PGB
22 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *