जाणून घ्या वर्षभरात सर्वांधिक विक्री झालेल्या Cars
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
2023 या वर्षीत देशात अनेक नव-नवीन कार्स लाँच झाल्या. इलेक्ट्रीक कार्स च्या नवनवीन मॉडेल्स वापरण्यासही ग्राहकांनी सुरुवात केली आहे.Tata Tiago EV आणि Toyota Innova Hycross Q3 या कार या वर्षी सर्वात जास्त विकल्या गेल्या आहेत. Toyota Innova Hycross ने Q3 2023 मध्ये भारतातील सर्वाधिक विकली जाणारी मजबूत हायब्रिड EV म्हणून आपले स्थान निश्चित केले आहे. दोन्ही मॉडेल आपापल्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या कार होत्या.
2023 मध्ये आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेल कार सेगमेंटमध्ये, 1.2L पेट्रोल इंजिनसह मारुती स्विफ्टने या विभागात वर्चस्व राखले आहे आणि 7 टक्के मार्केट शेअर मिळवला आहे. आता कंपनी 2024 च्या सुरुवातीस नेक्स्ट जनरेशन स्विफ्ट लाँच करण्याच्या तयारीत आहे. 1.5 लिटर डिझेल इंजिन विभागात, महिंद्राच्या बोलेरोने निम-शहरी आणि ग्रामीण बाजारपेठेत आपला दबदबा कायम राखला असून एकूण 81,344 युनिट्सच्या विक्री केली आहे.
भारतीय कार खरेदीदारांमध्ये CNG हा इंधनाच्या कार्सनाही पसंती दाखवली आहे. चालू वर्ष 2023 मध्ये, मारुती सुझुकी वॅगनआर ही सर्वाधिक विकली गेलेली CNG कार आहे. या कारने 66,406 युनिट्सच्या विक्रीसह 17 टक्के मार्केट शेअर मिळवले आहे.
SL/KA/SL
4 Nov. 2023