मकर संक्रांत निमित्य पतंगबाजीला उधाण
नागपूर, दि 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपूरात मकर संक्रांत निमित्य पतंग बाजीला उधाण आलेले आहे. मकर संक्रात निमित्य विविध आकाराच्या आणि रंगांच्या पतंगांनी, मांज्याने बाजार सजले असून ते खरेदी करण्यासाठी काल सांयकाळाच्या वेळेला बाजारात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी दिसत होती.
1 रुपयांपासून ते 300 रुपयांपर्यंत पतंग बाजारात उपलब्ध होत्या. नायलॉन मांजावर बंदी असल्यामुळे नागरिकांनी बरेली मांज्याला पसंती दिली आहे. मकर संक्रात निमित्य आज सकाळ पासूनच नागरिक खुल्या मैदानावर, गच्चीवर पतंग उडवताना दिसत आहेत.
डीजे आणि ओ काट चा आवाज गच्चीवर ऐकू येत आहे. बच्चे कंपनी देखील पतंग उडविण्याचा आनंद घेत आहेत. नागरिकांनी नायलॉन मांजाचा उपयोग करू नका असे आवाहन विविध सामाजिक संघटनाद्वारे करण्यात आलेले आहे.
ML/KA/SL
15 Jan. 2023