अंबाबाई मंदिरात किरणोत्सव सोहळा

 अंबाबाई मंदिरात किरणोत्सव सोहळा

कोल्हापूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई किरणोत्सव सोहळा महालक्ष्मी मंदिरात लक्ष्मीपूजनाची दिवशी पूर्ण झाला. Kironotsav ceremony at Ambabai temple

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात गेले चार दिवस किरणोत्सव सोहळा सुरू आहे. सलग तीन दिवसापासून सुरू असलेल्या किरणोत्सवात
आज चौथ्या दिवशी सूर्यकिरणांनी देवीच्या चरणांना स्पर्श केला. गेले तीन दिवस ढगाळ आणि अंधुक वातावरणामुळे किरणोत्सव होऊ शकला नव्हता.

मात्र आज किरणोत्सव सोहळ्याचा चौथ्या दिवशी काल मावळत्या सूर्याची किरणं ठीक 5 वाजून 45 मिनिटांनी देवीच्या चरणाला स्पर्श करून सूर्याची किरणं देवीच्या उजव्या बाजूस लुप्त झाली. सायंकाळी चार वाजून 49 मिनिटांनी सूर्यकिरण महाद्वारात पोहोचली. पाच वाजून 29 मिनिटांनी गणपती चौकात सूर्याची किरणं पोहोचली.
तर पाच वाजून 43 मिनिटांनी देवीच्या कटंजनापर्यंत सूर्यकिरणं पोहोचली.

अखेर पाच वाजून 45 मिनिटांनी सूर्यकिरणांनी देवीच्या चरणांना स्पर्श केला. त्यानंतर घंटानाद झाला आणि देवीची आरती करण्यात आली. भाविकांनी आणि पर्यटकांनी हा किरणाचा सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती यानंतर महालक्ष्मी मंदिरात लक्ष्मीपूजनही झालं.

ML/KA/PGB
13 Nov 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *