सप्तश्रुंग गडावर किन्नरांचा मेळा, देशभरातील किन्नर दाखल…
नाशिक, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गडावर कोजागिरी पोर्णिमेचा मुहूर्त साधण्यासाठी भविकांनी मोठी गर्दी केली आहे. कोजागिरी पोंर्णिमेला तृतीय पंथीयांना विशेष असे महत्व असते. देशभरातील किन्नर येथे हजेरी लावतात. तृतीय पंथीयांचा छबिना या उत्सवाचे खास आकर्षण आहे. हा सोहळा पहाण्यासाठी भाविक सप्तशृंगी गडावर आवर्जून उपस्थित राहतात.
किन्नरांमध्ये शीव-पार्वतीची रुपे समाविलेली असल्याने किन्नर देवीची निर्मळ मनाने आराधाना करतात, किन्नर आणि त्यांचे गुरु त्याचे देवर्यातील देवीच्या प्रतिमा तसेच मृर्ती घेवून गडावर येतात.सप्तशृंगी गडावर शाही स्नान घालून साडी, चोळी, अंतर, वेणी आणि शृंगाराचे साहित्याने देवीला सजवित देवीचा छबिना काढत, तृतीय पंथीय ढोल, ताश्या तसेच पारंपारिक वाद्यावर ठेका धरून देहभान हरपून नृत्य करतांना दिसत आहे.
छबिन्यामध्ये भाविक सहभागी होतात. रात्रभर किन्नर देवीला जागविण्यासाठी तिची आराधना करतात, कोजागिरी पोर्णिमेच्या उत्सवाची एका आगळी आख्यायिका आहे. देवीचा छबिना रात्रभर सुरू राहणार आहे. वर्षानुवर्षे तृतीयपंथीयांचा कोजागिरीचा हा सोहळा सुरू आहे. दिवसेंदिवस यात वाढ होतांना दिसून येत आहे.
ML/KA/SL
29 Oct. 2023