किंग खानची लेक नांदणार अँग्री यंग मॅनच्या घरी?
मुंबई, दि. 06 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बॉलीवुडमधील अफेअर, रिलेशनशिप्स हे कायमच खास चर्चेचे विषय ठरलेले असतात. बऱ्याचदा नवीन वर्षाच्या सुरुवातीला रिलेशनशिप्स अनाऊन्समेंट किंवा लग्नाच्या बातमीने वर्षाची सुरुवात हे ठरलेले असते. तर बऱ्याचदा छुपछुपके होणाऱ्या भेटीगाठी कॅमेऱ्यात पकडल्या गेल्यावर त्याची खास चर्चा रंगते.
हा नेहमीचाच ट्रेंड झाला आहे…यातून सेलिब्रिटीजची पुढची पिढी जी आता त्या वयात आली आहे ती तरी कशी सुटणार….
नुकतेच किंग खानचा मुलगा आर्यन खानचे नाव नोरा फतेहीसोबत जोडले गेले होते. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहानाच्याही बातम्या येत आहेत.
शाहरुख खानची मुलगी सुहाना खान अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हिला डेट करत असल्याची बातमी आहे. दोघेही ‘द आर्चीज’ या चित्रपटामध्ये एकत्र काम करणार आहेत. कपूर कुटुंबाने अलीकडेच ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले होते ज्यात अगस्त्य नंदा आणि सुहाना खान एकत्र दिसले होते. अगस्त्य हा राज कपूर यांची मुलगी रितू नंदा यांचा नातू आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अगस्त्याने सुहानाची तिच्या कुटुंबियांशी जोडीदार म्हणून ओळख करून दिली आहे. ‘द आर्चीज’ च्या सेटपासून दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. अशा परिस्थितीत दोघांचे नाते हळूहळू घट्ट होत गेले. सुहाना आणि अगस्त्य दोघेही एकमेकांसोबत बराच वेळ घालवतात. तसेच ते त्यांचा बाँड लपवण्याचा प्रयत्नही करत नाहीत.
सुहाना श्वेता नंदालाही खूप आवडते आणि श्वेताचा दोघांच्याही नात्यावर कुठलाच आक्षेप नाही. दरम्यान, अगस्त्य आणि सुहानाच्या अफेअरच्या चर्चा होत असल्या तरी श्वेताने किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे सेटवरचा या दोघांचा बाँड फक्त मैत्रीचाच आहे की त्या पलीकडे आहे, हे येत्या काळातच कळेल.
तसेच, सुहाना अगस्त्याची बहीण नव्या नंदाची ही मैत्रीण आहे आणि दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. नव्याचे नाव सध्या गहराइयाँ फेम सिद्धांत चतुर्वेदीसोबत जोडले जात आहे. दोघेही अनेकदा क्वालिटी टाइम घालवताना दिसतात.
ML/KA/PGB
06 Jan. 2023