किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग 15 ऑगस्ट पर्यंत बंद !

 किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग 15 ऑगस्ट पर्यंत बंद !

महाड दि १५(मिलिंद माने )– छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर आगामी १५ ऑगस्ट पर्यंत संभाव्य आपत्तीमुळे जीवित अथवा वित्तहानी होऊ नये या उद्देशाने रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी गडावर जाणारा पायरी मार्ग सर्व नागरिक, पर्यटकांसाठी प्रतिबंधित केल्याची माहिती लेखी आदेशाद्वारे दिली आहे.

मात्र पायरी मार्ग बंद म्हणजे रायगड रोपे चा गल्ला भरण्याचा उद्देश तर नाही ना असा सवाल देखील रायगडावर येणाऱ्या असंख्य पर्यटकांकडून विचारला जात आहे. यासंदर्भात महाड उपविभागीय अधिकारी.


यांच्या २० जून च्या अहवालानुसार आगामी पावसाळ्यामध्ये किल्ले रायगडावर जाणाऱ्या पाऊलवाटे वर पावसाळ्याच्या काळात दगडी वारंवार पडण्याच्या घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसून दगडी पडून कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्त आणि होऊ नये याकरता किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग पावसाळा ऋतू संपेपर्यंत बंद करण्यात यावा व पर्यटकांना किल्ले रायगडावर जाण्यासाठी रोपवेचा वापर करण्याबाबत प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्धी करावी अशी विनंती उपविभागीय अधिकारी महाड यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे केली होती.

या अहवालानुसार पायरी मार्गावर दरड कोसळणे, पाण्याचा प्रवाह वाढल्यास पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, म्हणून पायरी मार्गावरील किल्ले रायगडावर जाण्यास प्रतिबंध करण्यात यावा असा निर्णय रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी घेतला असून. याची अंमलबजावणी मंगळवार १५ जुलै पासूनच लागू झाली आहे .

जुलै महिन्यात अतिवृष्टीचा इशारा असल्याने नागरिक व पर्यटकांना या मार्गाने जाण्यास प्रतिबंध करावा यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड यांनी नाणे दरवाजा, चित्तदरवाजा तसेच किल्ले रायगड येथे पुरेसा बंदोबस्त ठेवावा असे सुचित करण्यात आले आहे.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्याचे दिसून आल्यास संबंधित व्यक्ती विरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 51, 54, 56 अन्वये कारवाई करण्यात येईल असे लेखी आदेशात नमूद करण्यात आले आहे.

रोपवेचे दर व पर्यटकांना नाहक भुर्दंड?

किल्ले रायगडावर पावसाळ्यात जाण्यासाठी शिवभक्त व पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात परंतु पायरी मार्गावर दरड पडून कोणत्याही प्रकारचे जीवित आठवा वित्त हानी होऊ नये याकरता किल्ले रायगड वर जाणारा पायरी मार्ग हा पावसाळा ऋतू संपेपर्यंत बंद करण्यात यावा व पर्यटकांना किल्ले रायगडावर जाण्याकरिता रोपवेचा वापर करणे बाबत प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्धी व्हावी याचा अर्थ रोपवेचा गल्ला भरणे हा नाही का अशी प्रतिक्रिया रायगड किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या मार्गावरील अनेक शिवभक्तांनी बोलून दाखवली. आम्ही रायगड किल्ल्यावर येतो मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होण्यासाठी येतो मात्र रायगड रोपवे चे वाढत जाणारे अवाच्या सव्वा दर हे कमी करण्याबाबत रायगडचे लोकप्रतिनिधी मूग गिळून का गप्प बसतात असा सवाल देखील अनेक पर्यटकांनी संतप्तपणे बोलून दाखवला. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *