खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा, यंदाही महाराष्ट्रच अव्वल….

 खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा,  यंदाही महाराष्ट्रच अव्वल….

चेन्नई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्राने गतवेळप्रमाणेच यंदाही खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद आपल्या नावावर करीत निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान घेणाऱ्या महाराष्ट्राला ५७ सुवर्ण, ४८ रौप्य,५३ कांस्य अशी १५८ पदके मिळाली. यजमान तामिळनाडू संघाने ३८ सुवर्ण, २१ रौप्य, ३९ कांस्य अशी ९८ पदके जिंकून दुसरे स्थान घेतले. हरियाणा संघाला पदक तालिकेत तिसरे स्थान मिळाले त्यांनी ३५ सुवर्ण, २२ रौप्य,४६ कांस्य अशी एकूण १०३ पदकांची कमाई केली.

महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी ११ सुवर्ण,१० रौप्य आणि ६ कांस्य अशी एकूण २७ पदके जिंकून पदक तालिकेमध्ये मोठा वाटा उचलला. त्या खालोखाल जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राला नऊ सुवर्णपदकांसह १७ पदके मिळाली तर कुस्तीमध्ये महाराष्ट्राला चार सुवर्णपदकांसह १४ पदकांची कमाई झाली ॲथलेटिक्स मध्ये १२ तर वेटलिफ्टिंगमध्ये १३ पदके महाराष्ट्राने जिंकली. योगासनामध्ये महाराष्ट्राला ११ पदके मिळाली.

जलतरणामध्ये महाराष्ट्राने मुले आणि मुली या दोन्ही गटात सांघिक विजेतेपद पटकाविले.
शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या ऋषभ दास याने यंदाच्या स्पर्धेतील ५० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यत २४.२२ सेकंदात पार केली आणि या स्पर्धेतील यंदाचे चौथे सुवर्णपदक जिंकले. पाठोपाठ त्याने महाराष्ट्राला रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकून आपले पाचवे सुवर्णपदक नोंदविले. तो नवी मुंबई येथील खेळाडू असून आजपर्यंत त्याने राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली आहेत. ऋषभ याने अथर्व संकपाळ, रोनक सावंत आणि सलील भागवत यांच्या साथीत चार बाय शंभर मीटर्स फ्रीस्टाईल रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. ही शर्यत त्यांनी तीन मिनिटे ३५.५२ सेकंदात पूर्ण केली. मुलींच्या गटात निर्मयी अंबेटकर हिने २०० मीटर्स बटरफ्लाय शर्यतीत कास्यपदक जिंकताना दोन मिनिटे २६.९१ सेकंद वेळ नोंदवली. तिची सहकारी अलिफिया धनसुरा हिने ५० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यत २७.०७ सेकंदात पार केली आणि सुवर्ण पदक जिंकले. हिबा चौगुले हिने ५० मीटर्स शर्यतीत रुपेरी कामगिरी करताना ३४.९४ सेकंद वेळ नोंदविली. Khelo India Youth Sports Competition, this year too Maharashtra tops…

ML/KA/PGB
31 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *